Showing posts with label कूर्ग. Show all posts
Showing posts with label कूर्ग. Show all posts
Tuesday, October 4, 2011
Coorg Diary - Part IV
शुक्रवार
आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर, बच्चे मंडळींनी जाहीरच करून टाकले आहे की ते कोठेही साईट सीइंग करायला येणार नाहीत म्हणून. त्यांना रिसॉर्टच्या फन झोन मधेच खेळायचे आहे. मी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा थोडाफार निष्फळ प्रयत्न करून बघतो व लॉस्ट केस म्हणून सोडून देतो. मुले नाहीत म्हणजे त्यांचे आई-बाबा नाहीतच. मग शेवटी आम्हीच ज्येष्ठ नागरिक उरलो, साईट सीईंगला जाण्यासाठी! मडिकेरीच्या जवळच, अबी फॉल्स म्हणून एक धबधबा आहे तो बघायला जाण्यासाठी मग आम्हीच निघतो.
Friday, September 30, 2011
Coorg Diary Part III
आश्चर्यकारक रित्या, आज आम्ही सर्व जण, न्याहरीसह सगळे आटोपून, सकाळी 7-30 वाजताच तयार आहेत. पावणेआठ पर्यंत, आम्ही परत एकदा कूर्गच्या फेरफ़टक्याला निघालो सुद्धा आहोत. बच्चे मंडळींचा उत्साह समजण्यासारखा आहे कारण आमचा पहिला हॉल्ट आहे एलिफन्ट कॅम्पला.
मडिकेरी गाव सोडून कोठेही जायचे असले तरी जनरल करीअप्पा चौक ओलांडल्या शिवाय कोठेच जाता येत नाही.
Thursday, September 29, 2011
Coorg Diary -Part II
बुधवार
नेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत.
Wednesday, September 28, 2011
Coorg Diary - Part I
मंगळवार
बेंगलुरूच्या विमानतळावर आमचे विमान उतरले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजून गेले होते. बेंगलुरूचा हा नवीन विमानतळ मोठा प्रशस्त व नेटका आहे. पण या विमानतळावर येणार्या उतारूंची मुख्य अडचण काही वेगळीच आहे. हा नवीन विमानतळ शहरापासून 30-40 किलोमीटर तरी अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळावरून शहरात जायचे म्हणजे एकतर मोठ्या वाहतूक मुरंब्याला तोंड द्यावे लागते आणि दुसरे म्हणजे टॅक्सीचे भाडे 500 ते 600 रुपये तरी द्यावे लागते. विमान प्रवासचे तिकिट 2000 रुपये आणि टॅक्सी भाडे 600 रुपये हे गणित काही पचनी पडत नाही. विमान तळ बांधतानाच त्यापासून ते शहरापर्यंत जलद वाहतुक सेवा कशी देता येईल याचा विचार आपल्याकडचे नियोजक का करत नाहीत? हे एक कोडेच आहे.
Subscribe to:
Posts (Atom)